Nashik : गुन्हे शाखेने उघडकीस आणले २२ गुन्हे, अट्टल गुन्हेगारांना अटक

नाशिकमध्ये चैनस्नेचिंग प्रकरणांवर मोठी कारवाई, दोन सराईत गुन्हेगार अटकेत

Nashik : नाशिकः नाशिक शहरात चैनस्नेचिंगच्या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत रेकॉर्डवरील दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक करून एकूण २२ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये २० चैनस्नेचिंग, १ मोटारसायकल चोरी, आणि १ घरफोडीचा समावेश आहे.

Nashik : गुन्हे शाखेने उघडकीस आणले २२ गुन्हे, अट्टल गुन्हेगारांना अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी योगेश दत्तु गायकवाड आणि किरण छगन सोनवणे यांना अटक केली. चौकशीत त्यांनी नाशिक शहरातील २२ गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून २२ तोळे सोने, ७०,००० रुपये किंमतीची मोटारसायकल, ३०,५०० रुपये किंमतीची देशी पिस्तूल आणि इतर मुद्देमाल असा एकूण १८,११,८०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

नाशिकमध्ये चैनस्नेचिंग प्रकरणांवर मोठी कारवाई, दोन सराईत गुन्हेगार अटकेत
नाशिकमध्ये चैनस्नेचिंग प्रकरणांवर मोठी कारवाई, दोन सराईत गुन्हेगार अटकेत

सखोल तपास आणि सीसीटीव्ही फुटेजचा वापर

गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील विविध चैनस्नेचिंगच्या घटनांची सखोल तपासणी केली. घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाचा उलगडा

योगेश गायकवाड याच्यावर संगमनेर (जि. अहमदनगर) आणि हैदराबाद येथील डामेरा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत. यामुळे तो एक अट्टल सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.

Nashik पोलीस पथकाची कामगिरी

सदर कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

पुढील तपास सुरू

सदर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून त्यांच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. पोलीस पथक पुढील आरोपींचा शोध घेत आहे.

He Pan Wacha : Nashik : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारास अंबड पोलिसांनी (Ambad Police) घेतले गजाआड