Nashik : कांदा दरातील सातत्यपूर्ण घसरणीने संतप्त शेतकऱ्यांनी येवल्यात लिलाव बंद पाडून मनमाड-येवला रस्त्यावर आंदोलन केले. शनिवारी तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली.
आठवडाभरापासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असून लाल कांद्याच्या वाढलेल्या आवकेमुळे देशांतर्गत मागणी कमी झाली आहे. याशिवाय कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यातीतही अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, कांद्याच्या दरात दोन हजार रुपयांहून अधिक घट झाली आहे.
Nashik : कांदा दरातील घसरणीने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन, महामार्ग ठप्प
दोन दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. शनिवारी त्याची पुनरावृत्ती येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. कांद्याला केवळ १५०० ते १६०० रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले. छावा संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लिलाव बंद करत महामार्गावर ठिय्या दिला.कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करावे. शेतकऱ्यांना २५ रुपये प्रति किलोप्रमाणे अनुदान मिळावे.
नाफेड आणि एनसीसीएफद्वारे खरेदी करण्यात आलेल्या कांद्यामधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. अधिक मागण्या शेतकऱ्यांनी केले आहे
पोलिसांना निवेदन सादर केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, कांदा दराबाबत शेतकऱ्यांच्या संतापाचा सूर अद्यापही कायम आहे.
हे पण वाचा : Onion : कांद्याच्या दरात ५६ टक्क्यांची घसरण, शेतकऱ्यांचे आंदोलन; निर्यातीवरील शुल्क कमी करण्याची मागणी