Nashik : कथित काश्मिरी पंडित प्रकरण: बनावट हल्ला, बनावट पत्ता, अन् पोलिसांच्या जाळ्यात फरार आरोपी

कथित काश्मिरी पंडित प्रकरण: बनावट हल्ला, बनावट पत्ता, अन् पोलिसांच्या जाळ्यात फरार आरोपी

Nashik : काश्मिरी पंडित असल्याचा बनाव करणारा अल्पवयीन मुलगा वडाळा येथील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार संशयित असल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी (दि. २९) मुंबईनाका येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेसाठी सज्ज होताच Nashik इंदिरानगर पोलिसांनी साध्या वेशात छापा मारून त्याला ताब्यात घेतले.

बनावट हल्ल्याचा खळबळजनक पर्दाफाश

वडाळागावातील तैबानगर येथे शुक्रवारी (दि. २०) रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत हा संशयित आरोपी सहभागी होता. परंतु, स्वतःला पीडित भासवण्यासाठी या मुलाने मित्रांकडून धारदार वस्तूने पाठीवर जखमा करून घेतल्या आणि खोटे प्लॅस्टर चढवून हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा केला. शनिवारी (दि. २१) बिटको रुग्णालयात दाखल होऊन डॉक्टरांकडून जखमेवर टाके घेतले आणि प्लॅस्टरही लावून घेतले.

वैद्यकीय तपासणीने उघड केले सत्य

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत हातावरील प्लॅस्टर बनावट असल्याचे आणि एक्स-रेमध्ये कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले. मुलाने वेदना होत नसल्याचे सांगून पोलिसांना संशय आणखी बळावला.

अर्जावर खोटा पत्ता

Nashik पोलिस उपायुक्त कार्यालयात दिलेल्या अर्जात अंबड म्हाडा येथील पत्ता नमूद केला होता. परंतु तो पत्ताही खोटा असल्याचे समोर आले. आरोपीचे कुटुंब अंबडच्या एका कंपनीत काम करत असून तो पत्र्याच्या खोलीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मास्टरमाइंडचा शोध सुरू

पत्रकार परिषद आयोजित करण्यामागे कोण आहे? आरोपीला असे वागण्यासाठी प्रवृत्त करणारा मास्टरमाइंड कोण? याचा शोध इंदिरानगर पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.