Nashik, पंचवटी आणि पूर्व विभागात महापालिकेच्या वतीने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत लामखेडे मळा, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, डेंटल कॉलेज, टकले नगर, वडाळा नाका आणि सारडा सर्कल येथे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली.
कार्यवाहीदरम्यान फ्लेक्स बोर्ड, हातगाड्या, वजन काटे इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून, दोन ट्रक भरून हे साहित्य आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आले.
या मोहिमेत उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. मयूर पाटील, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, प्र सहायक अधीक्षक एस. आर. चौधरी आणि पंचवटी व नाशिक पूर्व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
Nashik महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले गेले असून, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी अडथळे दूर करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना बेकायदेशीर अतिक्रमण टाळण्याचे आवाहन केले आहे.