Nashik : मानिनी फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि डॉ. भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला आहे. हा कार्यक्रम अनुसूया नगर, तपोवन लिंक रोड येथील गांगुर्डे हॉल येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका सुमनताई भालेराव, वेध न्यूजच्या संपादक मनाली गर्गे, ॲड. पूनम तांबट, अर्चनाताई थोरात, मनीषा काळे, अरुणा सूर्यवंशी, महाराष्ट्राची शानच्या उपाध्यक्ष अनिताताई खवणे यांसारख्या अनेक मान्यवर महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या महिलांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.
डॉ. भारती चव्हाण यांनी “महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार” या विषयावर विचारमंथन करताना महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीचे मार्ग स्पष्ट केले. तर, डॉ. राजन पाटील यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपयुक्त उपाय सुचवत जागरूकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष सुरेखाताई वाघ आणि वंदना नागवंशी यांचे विशेष योगदान होते. सूत्रसंचालन अंकिता पाटील यांनी कौशल्याने पार पाडले, तर मानिनी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाची यशस्वीता सुनिश्चित करण्यासाठी अथक मेहनत घेतली.
कार्यक्रमासाठी सीमा पवार, संध्या मराठे, भारती पाटील, प्रवजा गांगुर्डे, ह्या मान्यवर उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा देणारा ठरला असून, उपस्थित महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.