नाशिक पूर्वच्या निवडणुकीत सुनील बागुलची चर्चा!

Nashik: Masapala Sharad Pavarancha Salla – Best work highlighted

नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक मतदार संघांमध्ये विविध पक्षांनी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवारीवरून नाराजीचा सूर उमटत असून, पक्षांतरेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात महत्त्वपूर्ण राजकीय हालचाली सुरू आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचाराची सुरुवातही केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात चर्चेचा विषय सुनील बागुल ठरले आहेत. त्यांना या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून गळ घालण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

सुनील बागुल यांचे नाशिकच्या राजकारणातील स्थान आणि ओबीसी तसेच मराठा समाजातील प्रभाव पाहता, ते या निवडणुकीतील महत्त्वाचे उमेदवार ठरू शकतात. त्यांनी शिवसेनेत अनेक वर्षे काम केले असून, नाशिक मध्य मतदार संघातून विधानसभेची निवडणूकही लढवली आहे. शिवसेनेत वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, भाजपमध्येही त्यांना समाधानकारक स्थान मिळाले नाही, त्यामुळे ते पुन्हा शिवसेनेत परतले आणि त्यांना उपनेते पद देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी भूमिका बजावून राजाभाऊ वाजे यांना निवडून आणले. यामुळे बागुल यांची लोकप्रियता आणि जनसंपर्क वाढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना नाशिक पूर्व मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी पवार गटाच्या ओबीसी चेहर्‍यांसोबतच मराठा समाजाच्या उमेदवारांना देखील संधी देण्याचा विचार केला जात आहे. जर बागुल निवडणूक लढले तर भाजपच्या राहुल ढिकले यांच्यासाठी मोठे आव्हान उभे राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या सगळ्या घडामोडींमध्ये सुनील बागुल काय निर्णय घेतील, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे..