11 Feb : Nashik MD Drugs : नाशिकमध्ये एम.डी. ड्रग्ज विक्री करणारा आरोपी गजाआड! पोलिसांची मोठी कारवाई(Arrested)

Nashik, MD Drugs, Sale, Accused, Arrested, Police, Major Action

अंमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई

नाशिक – पोलिसांचा मोठा सापळा, गुन्हेगाराला अटक

नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत MD Drugs (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत ४२,५०० रुपयांचा अंमली पदार्थ आणि एकूण ७२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

WhatsApp Image 2025 02 11 at 15.07.32 b3453a4c

MD Drugs अटक झालेला आरोपी कोण?

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर संजय पाटील (वय ३१, रा. गजानन पार्क कॉलनी, आडगाव, नाशिक) असे आहे. तो यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून, त्याच्याविरुद्ध पंचवटी आणि सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

MD Drugs कशी झाली पोलिसांची कारवाई?

अंमली पदार्थविरोधी पथकाच्या प्रभारी वपोनि सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सागर पाटील हा एम.डी. ड्रग्जचा साठा करून विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार, पंचवटीतील म्हाडा बिल्डिंगजवळ पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला रंगेहात पकडले.

WhatsApp Image 2025 02 11 at 15.07.33 8fbf9b60

किती मुद्देमाल जप्त करण्यात आला?

  • ०८.५ ग्रॅम मॅफेड्रॉन (MD Drugs ) ड्रग्ज – ४२,५०० रुपये
  • मोबाईल आणि मोटारसायकल – ३०,००० रुपये
  • एकूण जप्त मुद्देमाल – ७२,५०० रुपये

पोलीस तपास आणि पुढील कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वपोनि सुशिला कोल्हे, सपोनि सचिन चौधरी, विशाल पाटील, सपोउनि रंजन बेंडाळे, संजय ताजणे, मंगला जगताप आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.

नाशिकमध्ये नशेखोरी विरोधात पोलिसांची कठोर भूमिका

शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. आरोपीचा इतर गुन्ह्यांसाठी तपास सुरू असून, नशेच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

He Pan Wacha : MD Drugs : सांगली ‘एमडी ड्रग्ज’ हब? 700 कोटींचा साठा जप्त, मोठे तस्कर गजाआड!