Nashik : सय्यद पिंपरी (आडगाव) येथे बुधवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत युवकाचे नाव मंगेश मधुकर दळवी (वय २१) असे आहे.
बुधवारी तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मंगेश दळवीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २) सकाळी चांदोरीजवळ आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम राबवली. सकाळी सव्वादहा वाजता पथकातील सागर गडाख, बाळू आंबेकर, राजेंद्र टर्ले, किरण वाघ आणि फकिरा धुळे यांनी मृतदेहाचा शोध लावला.