नाशिक: निवडणुकीसाठी संबंधित साहित्य व ईव्हीएम यंत्र ठेवण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे शहरातील चार ठिकाणी वाहतूक मार्ग बदलण्यात आले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
- दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर
- मिनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी
- छत्रपती संभाजी स्टेडियम, अंबड
- शासकीय कन्या शाळा, सीबीएस
निर्बंध लागू होणारे दिवस व वेळा:
- मंगळवार, १९ नोव्हेंबर:
सकाळी ७ वाजेपासून गायकवाड सभागृह परिसरात मतदान साहित्याचे वाटप सुरू होणार आहे. यामुळे त्या भागातील वाहतुकीवर निर्बंध. - बुधवार, २० नोव्हेंबर:
सायंकाळी मतदान साहित्य व ईव्हीएम यंत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार. - शनिवार, २३ नोव्हेंबर:
सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याने या भागांत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता.
वाहतुकीसाठी बंद मार्ग:
- गायकवाड सभागृह:
- हिरवे नगर (नंदिनी नदीच्या काठावरील रस्ता) ते सभागृह.
- पर्यायी मार्ग: नागजी सिग्नल ते भाभानगरमार्गे मुंबई नाका.
- मिनाताई ठाकरे स्टेडियम:
- स्वामीनारायण चौक ते वाघ कॉलेज (मुंबई-आग्रा महामार्गाचा समांतर रस्ता).
- कमलनगर चौक ते मिनाताई ठाकरे स्टेडियम.
- पर्यायी मार्ग: महामार्गाखालील उड्डाणपूल व कमलनगरकडून हिरावाडी-काठ्या मारुती चौक.
- छत्रपती संभाजी स्टेडियम:
- २३ नोव्हेंबर (पहाटे ४ ते रात्री ११):
- महाले पेट्रोल पंप ते सिंहस्थ नगर रस्ता.
- स्टेट बँक चौक (मायको हॉल) ते रतनसिंह परदेशी चौक (सेंट लॉरेन्स शाळा).
- सीबीएस-मेहेर सिग्नल रस्ता:
- २३ नोव्हेंबर (सकाळी ६ ते मध्यरात्र):
वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. - पर्यायी मार्ग: अशोकस्तंभ-मेहेर सिग्नल ते एमजी रोडमार्गे शालिमार.
नागरिकांना सूचना:
सर्वसामान्य नागरिकांनी वरील भागांमध्ये प्रवास टाळावा व पर्यायी मार्गांचा वापर करावा. यामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल.