Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) वतीने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून, २०२४ या वर्षात तब्बल ५८२ संस्था आणि व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत २९,०५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेने Nashik NMC शहरातील बाजारपेठा, शाळा, हॉटेल्स आणि विक्री केंद्रांवर छापे टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून संबंधित व्यक्तींवर दंड लावला जात आहे. ५०० ते २५,००० रुपयांपर्यंत दंडाची रक्कम आकारण्यात येत आहे.
“नाशिककरांनी या मोहिमेत सकारात्मक सहभाग घेऊन पर्यावरणाचे रक्षण करावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील.”
नियमांचे पालन करून प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारावी, असे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे.