NMC : नाशिकः नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा प्रामुख्याने

The investigation into the ₹55 crore land acquisition scam in the Nashik Municipal Corporation has faced delays due to various issues

नाशिकः नाशिक महानगरपालिका NMC क्षेत्रातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा प्रामुख्याने पाणी पुरवठा. बांधकाम. पथदिप, स्वच्छता, गटारी, अतिक्रमण इत्यादी तक्रारींच्या अनुषंगाने महानगरपालिका स्तरावर लोकशाही दिन दर महिन्याचे पहिल्या सोमवारी म्हणजे ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० पर्यंत महानगरपालिका NMC मुख्यालय, राजीव गांधी भवन येथील आयुक्तांचे दालन शेजारील सभागृहात आयुक्त तथा प्रशासक ना मनपा अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील नूसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची तक्रार थेट न स्विकारता नागरिकांनी त्यांची तक्रार दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या आधी महानगरपालिका NMC मुख्य कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याबाबत अध्यादेश निर्गमित केलेला आहे. तरी नागरिकांनी माहे जानेवारी-२०२५ महिन्याच्या लोकशाही दिनाच्या आधी तक्रारी नाशिक महानगरपालिका मुख्य कार्यालयात विहित नमुन्यात दोन प्रतीत सादर करावेत.

मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये ज्या वैयक्तिक तक्रारींवर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच तक्रारींचा स्विकार करण्यात येईल. सदरचे लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट, राजस्व/अपिल, विकसित करणेबाबत, सेवाविषयक, अस्थापना विषयक बाबी, सोडून फक्त वैयक्तीक स्वरुपातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत असलेल्या तक्रारीचे प्रत्येक विषयाचे स्वतंत्र निवेदनावर कार्यवाही करणेत येईल. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी केलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तरी नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी.