Nashik : शीतपेयामध्ये गुंगीकारक औषध मिसळून महिलेला जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी प्रतीक शिवाजी पानसरे (वय 23, राहणार संगमनेर) याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 पासून आतापर्यंत आरोपीने वेळोवेळी Nashik सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध करून अत्याचार करण्यात आला. याशिवाय, पीडितेचे नग्न छायाचित्रे मोबाइलवर काढून ती व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वेगवेगळ्या लॉज आणि फ्लॅटवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.