Nashik Road भागातील दुर्गा मंदिर, नवीन बिटको रुग्णालयाच्या समोर फूटपाथवर एका तरुणाचा संशयस्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नासिकरोड Nashik Road पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर मयत तरुणाचे नाव सुनील सूर्यवंशी वय- 35 राहणार. खर्जुल मळा, जुना ओढा रोड, नाशिकरोड Nashik Road असे असून त्याच्या छातीला पाठीला व हातापायांला गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत. यामुळे मृतदेह नेमकी मारहाणीनी झाला, की आकस्मित झाला यावर तर्कवितर्क लढवली जात आहे.
सदर मृतदेह नवीन बिटको हॉस्पिटल येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
सदर युवकाला बेदम मारहाण करून मृतदेह सदर ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात आज दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आकस्मत मृत्यूची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे…
He Pan Wacha : Khun : विडी कामगारनगर खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद – गुन्हे शाखा युनिट-१ ची मोठी कामगिरी