नाशिक | नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एकटी फिरत असलेली १४ वर्षीय नाबालिग मुलगी (Minor girl)आढळून आल्याने रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तत्परता दाखवत तिला चाइल्ड हेल्पलाइनकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
२९ जानेवारी २०२५ रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव आणि महिला प्रधान आरक्षक सरिता मोरे गस्त घालत असताना त्यांना एक नाबालिग मुलगी (Minor girl) एकटी फिरताना दिसली. ती घाबरलेली आणि लावारिस स्थितीत असल्याने आरपीएफ पथकाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणतीही स्पष्ट माहिती देऊ शकत नव्हती.
मुलीची सुरक्षितता लक्षात घेऊन आरपीएफने रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यानंतर तिला आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले. चाइल्ड हेल्पलाइनच्या प्रतिनिधी सुर्वणा वाघ आणि त्यांच्या टीमने तिची चौकशी केली.
चौकशीत मुलीने आपले नाव अलफिया परवीन शेख अलताफ (वय १४ वर्षे) सांगितले. तसेच आपल्या वडिलांचे नाव परवीन शेख अलताफ आणि मूळगाव हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र असल्याची माहिती दिली.
आरपीएफ आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने संवेदनशीलता राखत मुलीची वैद्यकीय तपासणी केली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला बालकल्याण समिती, नाशिककडे सुपूर्द करण्यात आले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या तातडीच्या आणि जबाबदार कृतीमुळे या मुलीला सुरक्षित ठिकाणी पाठवता आले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, जर कोणालाही स्थानक परिसरात लावारिस अथवा संकटात असलेले मूल दिसल्यास त्वरित आरपीएफ किंवा चाइल्ड हेल्पलाइनला माहिती द्यावी.