Nashik: नाशिक विधानसभा निवडणूक: ४६ इच्छुकांनी ८५ अर्ज खरेदी; २८ तारखेला शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल करण्याची शक्यता

Nashik Vidhansabha election 2024

नाशिक शहरातील विधानसभा निवडणुकांसाठी चार प्रमुख मतदारसंघांपैकी तीनमध्ये अद्याप उमेदवारांची अंतिम घोषणा झालेली नाही, त्यामुळे वातावरण काहीसे शांत आहे. २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर फक्त एक उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे, तर अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले आहेत. माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर दशरथ पाटील, गणेश गीते, उद्धव निमसे आणि अतुल मते यांच्यासह ४६ इच्छुकांनी एकूण ८५ अर्ज खरेदी केले आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक पश्चिम मतदारसंघातून ८१ जणांनी अर्ज खरेदी केले असून, २४ तारखेला ८ उमेदवारांनी १३ अर्ज घेतले आहेत. २८ ऑक्टोबरला बहुतांश उमेदवार अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार २८ तारखेला मोठ्या शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.

नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघांतही मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. दिलीप भामरे यांनी नाशिक पश्चिममधून भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत, तर नाशिक मध्य मतदारसंघातून १० जणांनी १६ अर्ज घेतले आहेत. इगतपुरी मतदारसंघातून अद्याप अर्ज दाखल झाले नसले तरी १७ अर्ज विकले गेले आहेत.