संदर्भ: दाते पंचांग
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
- गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४:
सप्तमी तिथी सकाळी १२:३१ वाजता संपते आणि त्यानंतर अष्टमी तिथी लागते. परंतु, सप्तमी सूर्यव्यापिनी (सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी) असल्यामुळे, १० ऑक्टोबर रोजी सप्तमी तिथी ग्राह्य धरली जाईल. - शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४:
अष्टमी तिथी दुपारी १२:०६ वाजता संपते आणि त्यानंतर नवमी तिथी लागते. परंतु, अष्टमी देखील सूर्यव्यापिनी असल्यामुळे, ११ ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी ग्राह्य धरली जाईल. - विशेष सूचना:
अश्विन कृष्ण अष्टमीचे हवन आणि महाष्टमी नवमीचा उपवास शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ रोजीच करावा.
“सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते ||”
भ्रम टाळा आणि योग्य दिवशी तिथीचे पालन करा!