नवरात्री, दुर्गेचे तिसरे स्वरूप
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
चंद्र घंट
अस्र-शस्र : खडग धनुष्य बाण
वाहन : सिंह
दुर्गेचे तिसरे शक्ती रुपपिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्त्रकैर्युता |प्रसादं तनुते मह्यां चन्द्रघण्टेति विश्रुता ||नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला ‘चंद्रघंटा देवी’ असे म्हटले जाते शरीराचा रंग सोन्या सारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्र आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते.
जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात, आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.या दिवशी साधकाचे मन ‘मणिपूर’ चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्या साठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे.
माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणिसंकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.ती च्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते.माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.
आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य ।प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य ।।