नाशिकः नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनिषा खत्री Manisha Khatri यांनी आज सर्व खातेप्रमुखांची पहिली बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहर विकासाच्या दृष्टीने सुरु असलेले सर्व प्रकल्प सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
खातेप्रमुखांना सादरीकरणाचे आदेश: सर्व विभागांना त्यांच्याकडील कामकाजाचा आढावा सादर करण्याचे निर्देश दिले.
केंद्र व राज्य शासनाशी समन्वय: प्रलंबित प्रकल्पांसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही.
पारदर्शक प्रशासन: कामकाजातील अडचणींसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन.
स्वच्छतेला प्राधान्य: शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहिमांचे नियोजन.
आयुक्त Manisha Khatri कुंभमेळा नियोजनावर भर
आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन संकल्पना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
मूलभूत सुविधा आणि नागरिकांचे समाधान:
नागरिकांना जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जाईल. तसेच, नागरिकांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
बैठकीनंतर आयुक्तांनी राजीव गांधी भवन येथील विविध विभागांची पाहणी करून त्यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला.
नाशिकच्या विकासासाठी प्रशासनाचा ठाम निर्धार!
Vedh News Nashik
He Pan Wacha : NMC : नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी – महायुतीचा विजय निश्चित, महाविकास आघाडीला अस्तित्वाचा प्रश्न