नाशिक रोड परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि इतर नागरी समस्यांकडे महापालिकेचे NMC लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस सेवा दलाच्या नाशिक रोड शाखेने ठोस पाऊल उचलले आहे. शहर अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस सेवा दलाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. मीडिया सेलचे ज्ञानेश्वर चव्हाण, नाशिक सरचिटणीस नामदार, उपाध्यक्ष उमेश चव्हाण, राजन बनसोडे, सुहास गांगुर्डे, लहू जाधव, दीपक शिरसाठ, उमेश दासवानी, राजू करंडे, अजिज खान, प्रकाश चंदनसे, विनायक बत्तीसे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
रस्त्यांची दुरुस्ती व इतर नागरी समस्यांचे त्वरीत निराकरण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. या प्रश्नांकडे महापालिकेने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.