NMC : मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महापालिकेचा १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम सुरू

Under the guidance of the Chief Minister, the 100-day reform program of Nashik Municipal Corporation will begin

नाशिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी व्हीसी द्वारे सर्व महानगरपालिका NMC आयुक्तांसोबत बैठक घेत, राज्यातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करणे आणि शासकीय कार्यालयांची कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यानुसार, नाशिक महानगरपालिकेने पुढील १०० दिवसात केलेली सुधारणा व त्याचे कार्यान्वयन सुरु करण्यात आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

NMC मुख्य सुधारणा व कार्ये:

  1. वेबसाईट अपडेट आणि नागरिकांना सुलभता – नाशिक महानगरपालिकेच्या सर्व वेबसाईट्समध्ये सुधारणा करणे, जेणेकरून नागरिकांना त्याचा सहज वापर होईल.
  2. स्वच्छता आणि रेकॉर्ड व्यवस्थापन – कार्यालयांमध्ये नियमित सफाई, रेकॉर्ड ६ गड्ढे पद्धतीनुसार व्यवस्थीत ठेवणे व अवश्यक रेकॉर्ड नष्ट करणे.
  3. वाहन आणि स्क्रॅप व्यवस्थापन – जुनी सरकारी वाहने आणि स्क्रॅप वाहनांची विल्हेवाट लावणे.
  4. नवीन उपक्रमांची सुरूवात – नागरिकांसाठी दोन नवीन उपक्रम सुरू करणे, ज्यामुळे त्यांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळतील.
  5. तक्रारींचे निवारण – नागरिकांच्या तक्रारींचा वेळोवेळी निपटारा करणे व लोकशाही दिन कार्यक्रमात तक्रारींचा निवारण.
  6. स्वच्छता आणि सार्वजनिक सेवा – सार्वजनिक टॉयलेट्स आणि बाथरुम्सची नियमित स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
  7. गुंतवणूकीचे प्रकल्प – शहरातील विकास प्रकल्पांच्या अडचणींचा प्राथमिकतेने निपटारा करणे.