कांद्याचे Onion बाजारभाव देशभरात घसरल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या Onion निर्यातीवरील 20 टक्के शुल्क तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात आमदार निलेश लंके, बाजरंग सोनवणे, आमदार शोभा बच्छाव, गोवाल पाडवी, आमदार वर्षा गायकवाड, भास्कर भगरे आणि मारुतिराव कोवसे सहभागी झाले होते.

मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करताना महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कांद्याच्या दरांवर आलेल्या संकटावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. निर्यातीवरील शुल्क तात्काळ रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
He Pan Wacha : Kanda