मुंबई | 26 फेब्रुवारी 2025
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
OSD आणि PS : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी मंत्रालयात फिक्सर आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांना स्थान न देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता राज्य सरकारने सात मंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) आणि खासगी सचिव (PS) नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मंत्र्यांचे OSD आणि PS यादी जाहीर
सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, पाच मंत्र्यांसाठी OSD आणि दोन मंत्र्यांसाठी खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्याप काही मंत्र्यांच्या नियुक्त्या प्रक्रियेत असून, त्यासाठी नावांची छाननी सुरू असल्याचे समजते.
OSD नियुक्ती
- डॉ. भवानजी आगे पाटील – मंत्री गणेश नाईक
- अनिल गागणे – मंत्री मंगलप्रभात लोढा
- प्रशांत पाटील – मंत्री जयकुमार रावल
- राजेश मोरे – मंत्री आशिष शेलार
- डॉ. सुबोध नंदागवळी – मंत्री माणिकराव कोकाटे
- मंगेश पिसाळ – मंत्री बाबासाहेब पाटील
PS नियुक्ती
- प्रशांत खेडेकर – मंत्री इंद्रनील नाईक
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर चर्चा
या नियुक्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, “आम्हाला हवे असलेले OSD आणि PS मिळत नाहीत.” यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत “दलाल आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार नाही” असे ठाम मत व्यक्त केले.
फडणवीस म्हणाले,
“OSD आणि PS नेमण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. मंत्री आपल्या प्रस्तावासह नावे पाठवतात, परंतु सरकार कोणत्याही वादग्रस्त व्यक्तीला नियुक्ती देणार नाही.”
राजकीय घडामोडींवर लक्ष
या नियुक्त्यांमुळे सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी क्लीन प्रशासनाचा दावा केला, तर दुसरीकडे सात मंत्र्यांच्या OSD आणि PS नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.