सुषमा अंधारे Sushma Andhare म्हणाल्या, ‘सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते!’ प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेला अप्रस्तुत ठरवत तिला राजकीय हेतूचा आरोप केला.
परभणीतील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात गदारोळ होत असताना या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांदरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांची नावे घेत धनंजय मुंडे यांच्याशी जोडली होती.
यामुळे प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत स्वतःवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले. परंतु, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी प्राजक्ता माळीच्या या पावलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्राजक्ता माळीच्या स्पष्टीकरणावर सुषमा अंधारेंची sushma Andhare टीका
सुषमा अंधारे Sushma Andhare म्हणाल्या, “प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद घेणं हे अप्रस्तुत होतं. सत्याला कधीच स्पष्टीकरणाची गरज नसते. मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतात, आणि शत्रू ठेवत नाहीत. त्यांनी दुर्लक्ष केलं असतं तर हे प्रकरण शांत झालं असतं.”
राजकीय हेतूचा आरोप
सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. “जर स्पष्टीकरण द्यायचं होतं, तर करुणा मुंडेंच्या आक्षेपार्ह विधानानंतर का नाही दिलं? आता मात्र पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणलं जात आहे,” असं अंधारे म्हणाल्या.
प्राजक्ता माळी आणि आरएसएस संबंधावरून निशाणा
अंधारे पुढे म्हणाल्या, “प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयाला भेट देते. तेव्हा तिच्या कृतींना राजकीय रंग चढतो. त्यामुळे तिच्या पत्रकार परिषदेचा हेतू संशयास्पद वाटतो.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न?
सुषमा अंधारे यांच्या मते, “प्राजक्ता माळीच्या प्रकरणाला समोर आणून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लोकांचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे.”
He Pan Wacha: Vasantrao Deshmukh : वसंतराव देशमुख यांच्या वादग्रस्त विधानावर शालिनीताई विखे पाटील संतप्त