पुणे हादरलं! स्कूल बसमध्ये चिमुकलींवर अत्याचार

Pune Shaken: Heinous Crime Against Two Young Girls in School Bus

पुण्यातील वानवाडी परिसरातील धक्कादायक घटना , दोन चिमुकलींवर बस चालकाने केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. आरोपी 45 वर्षीय नराधम, एका नामांकित शाळेतील स्कूल बसमध्ये काम करत होता. 6 वर्षीय चिमुकली आणि तिच्या मैत्रिणीवर या नराधमाकडून गेल्या चार दिवसांपासून अत्याचार करण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

हा आरोपी चिमुकलींना बसमध्ये पुढच्या सीटवर बसवत होता आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचा गंभीर आरोप आहे. आपल्या घृणास्पद कृत्याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून या नराधमाने मुलींना धमकावले होते.

चिमुकलीच्या आईला तिच्या मुलीला वेदना होत असल्याचे जाणवल्यानंतर तिने विचारपूस केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply