नाशिक प्रतिनिधी: रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांनी नाशिक-शिर्डी दौऱ्याच्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकाला भेट दिली. या दौऱ्यात आदर्श विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. वैष्णव यांनी स्थानकातील वन स्टेशन, वन प्रॉडक्ट स्टॉलची पाहणी केली आणि तेथील स्थानिक उत्पादनांची माहिती घेतली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तसेच, त्यांनी विविध रेल्वे सहाय्यकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे निरीक्षण केले. नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचा आढावा घेत, स्टेशनच्या पुढील उन्नतीसाठी गरजेच्या बाबींवर चर्चा केली.यावेळी मंत्री महोदयांनी स्थानकावर उपस्थित प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेतल्या.
याप्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना, भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वैष्णव यांच्या या भेटीमुळे नाशिक रोड स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कार्याला वेग मिळणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.