Abhinav Singh Found Dead | Jagarnot Suicide Case
ओडिया इंडस्ट्रीतील प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंह (Abhinav Singh) उर्फ जगरनॉट (Juggernaut) याने आत्महत्या केली आहे. बंगळुरूमधील कडुबीसनहल्ली येथे त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मृतदेह आढळला. १२ फेब्रुवारी रोजी विष प्राशन करून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Juggernaut सुसाईड नोट जप्त – पोलीस तपास सुरू
पोलिसांनी अभिनव सिंह याने लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र त्याच्या कुटुंबाने पत्नीवर मानसिक छळाचा आरोप केला आहे.
कुटुंबाचा दावा – पत्नीमुळे मानसिक तणाव
अभिनवच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत पत्नी आणि इतर ८-१० जणांवर छळाचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या पत्नीबरोबर झालेल्या वादामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा दावा आहे.
‘जगरनॉट ’ – ओडिया इंडस्ट्रीतील प्रसिद्ध रॅपर
अभिनव सिंह हा केवळ रॅपर नव्हता, तर तो इंजिनिअर होता आणि बंगळुरूमधील एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने ‘कटक अँथम’ या हिट गाण्याने लोकप्रियता मिळवली होती.
पोलीस तपास सुरू
- पोलिसांनी अभिनवचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबाला सोपवला.
- आत्महत्येच्या घटनेत पत्नी आणि इतर आरोपींविरोधात चौकशी सुरू आहे.
- अभिनवच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.