जाणुन घ्या आजचे राशीभविष्य

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अश्विन शुक्ल तृतीया. क्रोधीनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज वृद्धी तिथी आहे” नक्षत्र: स्वाती/ (रात्री ९.३३ नंतर) विशाखा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. (विष्काम्भ योगाची शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळ आणि शनीशी शुभ योग आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. आवडती व्यक्ती भेटेल. कोर्ट कामात यश मिळेल. नात्यातून लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यापार वाढेल. भेटवस्तू मिळतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. लॉटरी मधून लाभ मिळतील. प्रेमात यश लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. जमीन व्यवहारात लाभ होतील. वाहन सुख लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. पैशांची तजवीज होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. विशेष अनुभव येतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन बदलले तरीही अंतिमतः ते तुमच्या फायद्याचे आहे. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. आरोग्य सुधारेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रसन्न ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. धार्मिक कामातून यश मिळेल. संतती कडून चांगली बातमी समजेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. दानधर्म करण्यास चांगला दिवस आहे.(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Leave a Reply