Rashi Bhavishya : रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ – आजचे राशीभविष्य

Today Rashibhavishya

Rashi Bhavishya: माघ कृष्ण दशमी/एकादशी | क्रोधीनाम संवत्सर | शके १९४६ | संवत २०८१
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (संपर्क: 8087520521)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आजचा शुभ आणि अशुभ काळ

  • राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
  • शुभ समय: दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे

चंद्रनक्षत्र आणि आज जन्मलेल्या बाळाची राशी

  • चंद्रनक्षत्र: मूळ / (संध्याकाळी ६.४३ नंतर) पूर्वाषाढा
  • आज जन्मलेल्या बाळाची राशी: धनु (वज्र योग, विष्टी करण, मूळ नक्षत्र शांती आवश्यक)

टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही.


आजचे १२ राशीभविष्य (Rashi Bhavishya)

मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

➡ चंद्र-रवी लाभ योग, शुक्राशी केंद्र योग.
सकारात्मक: बौद्धिक क्षेत्र गाजवाल, मार्ग सापडेल, प्रवास संभवतात.
सावधानता: नको त्या चर्चेत पडू नका.

वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

➡ आत्मसन्मान ठेवा, विनाकारण अहंकार टाळा.
सकारात्मक: आर्थिक फायदा, कुटुंबात समाधान.
सावधानता: वडिलांची काळजी घ्या.

मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

➡ मित्रांचे सहकार्य लाभेल, आर्थिक फायदा.
सकारात्मक: चांगल्या संधी मिळतील.
सावधानता: महिलांचा गैरसमज टाळा.

कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

➡ व्यवसायात वाढ, बाहेरगावी प्रवास संभवतो.
सकारात्मक: वक्तृत्व चमकेल, नवे तंत्रज्ञान शिकाल.
सावधानता: कामाच्या ओझ्याने तणाव येऊ शकतो.

सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

➡ अचानक लाभ, धार्मिक कार्य घडेल.
सकारात्मक: उपासनेचा चांगला परिणाम होईल.
सावधानता: खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

➡ अडथळे दूर होतील, नवी संधी मिळेल.
सकारात्मक: कायदेशीर बाबतीत यश मिळेल.
सावधानता: भावनिक निर्णय घेण्याआधी विचार करा.

तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

➡ व्यवसायात वाढ, आर्थिक प्रगती.
सकारात्मक: जोडीदाराची साथ मिळेल.
सावधानता: नवे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

➡ अनुकूल दिवस, अधिकार प्राप्त होईल.
सकारात्मक: सन्मान वाढेल, मार्ग सापडेल.
सावधानता: निर्णय घेताना घाई करू नका.

धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

➡ सौख्यदायक दिवस, आनंददायी अनुभव.
सकारात्मक: नावलौकिक वाढेल, आर्थिक लाभ.
सावधानता: आरोग्याची काळजी घ्या.

मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

➡ संमिश्र दिवस, अपेक्षाभंग होऊ शकतो.
सकारात्मक: काही नवीन संधी मिळतील.
सावधानता: राजकीय क्षेत्रात संयम बाळगा.

कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

➡ अनुकूल चंद्र, सुखद अनुभव.
सकारात्मक: आत्मविश्वास वाढेल, नवे ध्येय मिळेल.
सावधानता: व्यवसायात स्पर्धा तीव्र राहील.

मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

➡ आर्थिक लाभ, उत्साही मनःस्थिती.
सकारात्मक: दिवस आनंददायी असेल.
सावधानता: प्रिय व्यक्तीकडून भ्रमनिरास संभवतो.


ज्योतिष मार्गदर्शन:

तुमच्या कुंडलीसाठी आणि सविस्तर राशीभविष्यासाठी ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (सायन ज्योतिषी) यांच्याशी संपर्क साधा.
8087520521