Rashibhavishya: “मंगळ आणि शुक्र ग्रहांचा प्रभाव: तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्ये आणि जीवनातले यशस्वी गुण”

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

१८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

 तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.  तुम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही मित्रणाशी प्रामाणिक असतात. तुम्ही एक विश्वासू आणि जबाबदार नागरिक असतात. वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव, स्वातंत्रपणा, मान सन्मान ही तुमची वैशिष्टये आहेत. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतात. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असते. तुम्ही तापट असला तरी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःवर ताबा ठेवू शकतात. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि तुमच्या मध्ये धैर्य असते. तुम्हाला प्राणी प्रिय असतात आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुमची मानसिक शक्ती अफाट आहे. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन विशाल होतो. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. तुमचे विचार काळाच्या पुढे असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडी निवडी बाबत तुम्ही अत्यंत ठाम असतात. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. तुम्ही सतत एक विद्यार्थी असतात. जीवनात खरा आनंद शिकण्यात आणि शिकवण्यात आहे असे तुम्हाला ठामपणे वाटते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते.

व्यवसाय:- हॉटेल, बेकरी, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृह सजावट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्र मिल्ट्री, पोलीस, गुप्तहेर.

शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४. अश्विन कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू, क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज उत्तम दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. (वज्र योग शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – शनी लाभ योग आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. कठोर भूमिका घ्याल. न्याय कराल. कनिष्ठ सहकाऱ्याकडून त्रास होऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. विनाकारण वाद वाढतील. अति धाडस नको.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सान्निध्य लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत पुरेशी प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. पाळीव पशूंपासून काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सुटतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. मात्र शत्रू त्रास जाणवेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. दिलेला शब्द पाळावा लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. कोर्टात यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. कामाची गती वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. नियोजनात बदल होईल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल.

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521