Rashibhavishya: शुक्रवार, २४ जानेवारी २०२५. पौष कृष्ण दशमी/एकादशी.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्र नक्षत्र – अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
“आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे.”
मेष:- रविचा चंद्राशी लाभ योग आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. शत्रू पराभूत होतील. स्त्री धन वाढेल. अनैतिक कामे करू नका.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मानावा लागेल. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. विनाकारण वाद टाळा. आर्थिक लाभ होतील.
कर्क:- घरगुती काम पूर्ण होईल. शेअर्स मधून बरे लाभ मिळतील. अचानक धनलाभ संभवतो.
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नोकरीत त्रास होऊ शकतो. घरगुती कामे कराल.
कन्या:- आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील.
तुळ:- यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. भगिदरी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. वक्तृत्व चमकेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. हानी होऊ शकते.
मकर:- लाभ स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. कामाचा वेग वाढेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. दानधर्म करा. सिद्धी प्राप्त होतील. तीर्थाटन घडेल. सरकारी कामे मार्गी लागतील.
कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)