An Epic Saptashrunggad Chaitrotsav 2025: लाखो भाविकांचा महासागर सप्तशृंगगडावर

Saptashrunggad Chaitrotsav 2025: A Massive Spiritual Wave of Devotion Floods the Sacred Fort

Saptashrunggad Chaitrotsav 2025: A Massive Spiritual Wave of Devotion Floods the Sacred Fort

Saptashrunggad Chaitrotsav 2025 – महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या सप्तशृंगगडावर चालू असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवात () देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. रामनवमीपासून सुरू झालेल्या या यात्रेला भक्तांचा भरघोस प्रतिसाद लाभत असून, मंगळवारी (तिसऱ्या दिवशी) गड भक्तीमय वातावरणात न्हालेला दिसला.


चैत्रोत्सवातील धार्मिक पूजाअर्चा आणि उत्साह (Saptashrunggad Chaitrotsav 2025)

देवीची महावस्त्र मिरवणूक आणि पंचामृत महापूजा

देवीच्या महावस्त्र आणि अलंकारांची सवाद्य मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम यांच्या हस्ते पंचामृत महापूजा पार पडली. यावेळी ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saptashrunggad Chaitrotsav 2025
Saptashrunggad Chaitrotsav 2025:

भाविकांसाठी खास सेवा आणि २४ तास दर्शनाची सुविधा

  • मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले
  • दोन वेळा महाप्रसाद (अन्नदान)
  • पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था
  • २४ तास अग्निशमन बंब तैनात
  • स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारी

सप्तशृंगगडावर भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, देवी ट्रस्ट, आणि स्वयंसेवी संस्था कडून संयुक्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


विविध भागांतील पालख्या आणि पायी यात्रेकरूंची मांदियाळी

मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, नंदुरबार, धुळे, मालेगाव, जळगाव आदी भागांतील पालख्यापायी भाविकांचा ओघ सुरू आहे. सप्तशृंगी आदिमायेच्या जयघोषाने गड दुमदुमला आहे.


प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेसाठी आवाहन

ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जय दुबे यांनी प्लास्टिक बंदी पाळण्याचे, तसेच स्वच्छतेत सहकार्य करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.


सप्तशृंगी देवीचे विलोभनीय रूप

गडावरील देवीची मूर्ती पाहताना भक्त भारावून जात आहेत. छायाचित्रकार रघुवीर जोशी यांनी टिपलेले देवीचे तेजस्वी रुप प्रत्येकाला अध्यात्मिक ऊर्जा देत आहे.