SET Exam 2024: 4 मे रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार

"SET परीक्षा 2024 वेळापत्रक" "महाराष्ट्र आणि गोवा SET परीक्षा माहिती"

महाराष्ट्र आणि गोवा विद्यापीठासाठी महत्त्वाची माहिती

पुणे: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा (SET Exam 2024) येत्या 4 मे 2024 रोजी पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SET विभागाने ही घोषणा केली असून, परीक्षेची तारीख जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीचे नियोजन करता येणार आहे.

ऑफलाइन पद्धत कायम
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांनुसार, SET परीक्षा नेहमीप्रमाणे ओएमआर पद्धतीनेच होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार विद्यापीठाने व्यक्त केला होता. मात्र, आतापर्यंत घेतलेल्या 39 परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्यामुळे 40वी परीक्षा देखील पारंपरिक स्वरूपातच होणार आहे.

परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
SET Exam ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (NET) धर्तीवर घेतली जाते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. परीक्षा व अभ्यासक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती व वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Set Exam 2024 विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ
परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. “पारंपरिक पद्धतीने परीक्षा आयोजित करणे हे परीक्षार्थ्यांसाठी सोयीचे ठरेल,” असे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितले.

SET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम, व इतर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. परीक्षार्थ्यांनी वेळेत तयारीसाठी नियोजन करावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

He Pan Wacha: शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन