तुळजा भवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र उत्सवाची ( Shakambhari Navratri ) धामधूम
जय भवानी रोडवरील प्रतिष्ठित तुळजाभवानी मंदिरात ७ जानेवारीपासून शाकंभरी नवरात्रोत्सवाचा Shakambhari Navratri शुभारंभ होणार आहे. विश्वस्त मंडळाने या कार्यक्रमाची उत्सवमय रुपरेषा जाहीर केली असून, भाविकांसाठी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला सप्ताह नियोजित करण्यात आला आहे.
७ जानेवारी (मंगळवार): पहाटे देवीची प्रतिष्ठापना आणि घटस्थापना.८ जानेवारी (बुधवार): देवीची अलंकार महापूजा व रात्री छबीना.९ जानेवारी (गुरुवार): देवीची महापूजा.१० जानेवारी (शुक्रवार): शेषशाही महापूजा आणि छबीना.११ जानेवारी (शनिवार): सकाळी जलयात्रा व भवानी तलवार महापूजा.१२ जानेवारी (रविवार): अग्नीस्थापना, होम-हवन व नित्योपचार पूजा.१३ जानेवारी (सोमवार): शाकंभरी पौर्णिमा, पूर्णाहुती व घटोत्थापन.
१४ जानेवारी (मंगळवार): महाप्रसाद व रात्री मकरसंक्रांत पंचांग श्रवण.
दररोज सकाळी व संध्याकाळी साडेसात वाजता आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिराची खासियत
तुळजापूर येथील नवरात्र उत्सवांच्या धर्तीवर नाशिकमधील या मंदिरात शारदीय, चैत्र आणि शाकंभरी अशा तीनही नवरात्रोत्सवांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी १५ एप्रिलला प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. मंदिराच्या भव्यतेमुळे आणि आध्यात्मिक वातावरणामुळे येथे भाविकांचा ओघ सतत वाढत आहे.
पर्यटन स्थळाचा दर्जा
या वर्षी महाराष्ट्र शासनाने तुळजाभवानी मंदिराचा समावेश क वर्ग पर्यटन स्थळांमध्ये केला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांची संख्या अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
विश्वस्त मंडळाने भाविकांना आवाहन केले आहे की, या मंगलमय शाकंभरी नवरात्रोत्सवात सहभागी होऊन देवीचे आशीर्वाद मिळवावेत.