मराठी राजभाषा गौरव दिनी ऐतिहासिक सोहळा
Shirwade Village : कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मस्थळी, नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे (Shirwade Village ) (ता. निफाड) गावाला राज्यातील दुसरे ‘कवितेचे गाव’ म्हणून मान्यता मिळाली आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या (२७ फेब्रुवारी) निमित्ताने हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. मराठी भाषा विकासमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
शिरवाडे गाव (Shirwade Village ) (– महाराष्ट्रातील दुसरे ‘कवितेचे गाव’
राज्यात यापूर्वी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभा दांडा (वेंगुर्ले) या कवी मंगेश पाडगावकरांच्या गावाला ‘कवितेचे गाव’ म्हणून दर्जा मिळाला होता. आता कुसुमाग्रज यांच्या जन्मगावी हा मान मिळाल्याने साहित्य क्षेत्रात मोठी भर पडली आहे.
शिरवाडे (Shirwade Village ) ग्रामपंचायतीने ‘कवितेचे गाव’ दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
१५ दालनांसह ‘कवितेचे गाव’ संकल्पना साकारतेय!
शिरवाडे येथे १५ विशेष दालने उभारण्यात येणार आहेत, जिथे कुसुमाग्रज यांच्यासह अन्य थोर कवींच्या कविता व साहित्याचा समावेश असेल.
➡️ पहिल्या दालनाचे उद्घाटन २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
➡️ उर्वरित दालनांसाठी पुढील टप्प्यात नियोजन केले जाईल.
➡️ संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्राच्या साहित्यिक वारशाला उजाळा देणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला मराठी भाषा प्रेमींसह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उदय सामंत – मराठी भाषा विकासमंत्री
दादा भुसे – शालेय शिक्षणमंत्री
अॅड. माणिकराव कोकाटे – कृषिमंत्री
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासनमंत्री
आमदार दिलीप बनकर
याशिवाय ग्रामस्थ, साहित्य प्रेमी आणि मराठी संस्कृती जपणारे असंख्य नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषेचा अभिमान वाढवणारा उपक्रम
या ‘कवितेच्या गावामुळे’ महाराष्ट्राची साहित्यिक परंपरा जपली जाणार आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उभारला जाणारा हा प्रकल्प भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.