Simhastha Kumbh Mela 2026-27:जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण निर्देश

Simhastha Kumbh Mela 2026-27:

Simhastha Kumbh Mela 2026-27: नाशिक, 21 फेब्रुवारी: आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 (Simhastha Kumbh Mela 2026-27)च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनास प्राधान्य देत नियोजन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुरक्षा साहित्याचे तपशीलवार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बैठकीत नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी महत्वपूर्ण बाबी:

  1. आपत्ती व्यवस्थापन प्रणाली: प्रयागराज कुंभमेळ्याच्या अभ्यासानंतर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे घटना प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करावी.
  2. टास्क फोर्स व नोडल अधिकारी नियुक्ती: प्रत्येक विभागासाठी विशेष अधिकारी नेमले जातील.
  3. सुरक्षा उपकरणांची उपलब्धता: इतर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडील साधनसामग्रीची यादी मागविली जाईल.
  4. उष्माघात प्रतिबंधक उपाय: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, येत्या आठवड्यात विशेष आराखडा तयार करण्याचे निर्देश.
  5. वायरलेस ट्रेनिंग: अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
  6. अंतरजिल्हा समन्वय: छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि अन्य जिल्ह्यांतील नगरपरिषदा, देवस्थान ट्रस्ट व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधला जाईल.

सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 मध्ये कोट्यवधी भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, जिल्हा प्रशासनाने सुरक्षित, सुयोग्य व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सक्रिय होण्याचे निर्देश दिले आहेत.