नाशिक: डिजिटल युगात Social media वधू-वर शोधण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळे व सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र, या सुविधांचा लाभ घेताना फसवणुकीचा धोका अधिक आहे. लग्न जुळवणाऱ्या साइट्स व सोशल मीडिया social media प्लॅटफॉर्म्सवरून धोखेबाज प्रलोभने दाखवून लोकांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.
विवाह संकेतस्थळांवर वधू-वरांची छायाचित्रे व बायोडेटा उपलब्ध करून दिले जातात. परंतु प्रत्यक्षात तेच स्थळ सत्य असल्याची खात्री देता येत नाही. योग्य पडताळणी व चौकशीशिवाय कोणत्याही प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवणे महागात पडू शकते.
काही वेबसाइट्स व मॅट्रिमोनिअल ग्रुप ‘उत्कृष्ट मॅचिंग’चे आमिष दाखवून नोंदणीसाठी पैसे घेतात. सहा महिन्यांसाठी 1000-1500 रुपये घेतले जातात, मात्र योग्य जोडीदार मिळेलच, याची खात्री नसते.
स्थळ दाखवणाऱ्या एजंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मोठ्या शुल्काच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. काही वेळा एजंट पैसे घेतल्यावर संपर्क तोडून गायब होतात.
उपाययोजना
1. योग्य पडताळणी: बायोडेटा व छायाचित्रांची माहिती स्वतंत्रपणे पडताळावी.
2. विश्वासार्हता तपासावी: साइट्स व एजंटची प्रामाणिकता तपासूनच व्यवहार करावा.
3. फसवणूक टाळण्यासाठी दक्षता: कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची पावती ठेवावी व फसवणुकीची शक्यता वाटल्यास पोलिसांत तक्रार दाखल करावी.