नाशिक – वडाळागावातील घरकूल इमारतीत राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या suicide केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव राहुल रामचंद्र सोनवणे असे असून, तो घरातील खोलीत पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येमागील sucide नेमके कारण समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. सदर घटनेबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
युवकाच्या आत्महत्येमुळे suicide परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक तपास करत आहेत.