Rashibhavishya, ५ जानेवारी २०२५. पौष शुक्ल षष्ठी. राशिभविष्य

IMG 20250105 071204

Rashibhavishya : रविवार, ५ जानेवारी २०२५. पौष शुक्ल षष्ठी. राशिभविष्य

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“आज चांगला दिवस आहे” बांगरषष्ठी

नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा/उत्तरा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/(दुपारी २.३५ नंतर) मीन.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळशी त्रिकोण योग आहे. हर्षल शी लाभ योग आहे. उत्तम यश मिळेल. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा. संध्याकाळ आरोग्य चिंतेची.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीच्या ठिकाणी काही महत्वपूर्ण घटना घडतील. बदल होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. संध्याकाळ आनंदाची.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चंद्र अनुकूल आहे. प्रामाणिकपणा सोडू नका. ईश्वर उपासना लाभदायक ठरेल. संध्याकाळी कामे वाढतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र कालावधी आहे. मोठे जोखीम घेऊ नका. सकाळी अष्टम स्थानी चंद्र आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. जुनाट दुखणे डोके वर काढू शकतात.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वाद टाळावेत. भागीदारी व्यवसायात संशय निर्माण होऊ शकतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अर्थकारण अजूनही मजबूत होत आहे. व्यवसायिक प्रगती साध्य होईल. नवीन खरेदी होईल. खर्च वाढतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बऱ्यापैकी अनुकूलता लाभेल. आरोग्यचे प्रश्न निर्माण होईल. वाहन जपून चालवा. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जमीन व्यवहारात अधिक काळजी घ्यावी लागेल. पत्नीची काळजी घ्या. संध्याकाळ काहीशी सुखद अनुभव देणारी आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमचा स्वभाव शांत आहे. तुम्ही दिरघोद्योगी आहात. आज तुम्हाला याचाच लाभ मिळेल. संयम ठेवून काम करावे लागेल. क्रोध टाळा. आर्थिक लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आध्यत्मिक लाभ होतील. गूढ उलगडतील. जेष्ठ व्यक्तीची सेवा करा. राजकारणात फारसे यश नाही.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज दुपार पर्यंत तुमच्या राशीत चंद्र आहे. व्यावहारिक विचार करावा लागेल. दीर्घकालीन नियोजन कराल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) फारशी अनुकूलता नाही. विनाकारण खर्च वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळा. संध्याकाळ काहीशी सुखद अनुभव देणारी असेल.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.