Suresh Dhas : प्राजक्ता माळीच्या मागणीनंतर आमदार सुरेश धस यांची माफी

प्राजक्ता माळीच्या मागणीनंतर आमदार सुरेश धस यांची माफी

सुरेश धस Suresh Dhas यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीने प्रकरणावर टाकला पडदा

भाजप आमदार सुरेश धस Suresh Dhas यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांची नावे घेत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत महिला कलाकारांच्या नावांचा राजकारणासाठी गैरवापर होऊ नये, अशी भूमिका मांडली होती आणि सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

यानंतर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. अखेर, सोमवारी सुरेश धस Suresh Dhas यांनी दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, माझा हेतू महिलांचा अपमान करण्याचा नव्हता. जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे धस म्हणाले.

यावर प्रतिक्रिया देत प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले, “संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळाले. आमदार सुरेश धस यांनी मोठ्या मनाने माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणावर मी पडदा टाकते.”

प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. तिने सांगितले की, “आमदारांनी माफी मागितली आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही.”

या संपूर्ण प्रकरणावर आता पडदा पडला असून महिलांच्या सन्मानासाठी एक महत्त्वाचा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे.