भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन. 2004 ते 2014 या कालावधीत त्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या जाण्याने भारताने एक महान नेते गमावले.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 91 वर्षीय डॉ. सिंग यांनी 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या कालावधीत देशाचे पंतप्रधान म्हणून मोठ्या जबाबदारीने काम केले. त्यांच्या शांत व कणखर नेतृत्वामुळे ते देशवासीयांच्या कायम स्मरणात राहतील.
त्यांच्या जाण्याने संपूर्ण राजकीय क्षेत्र शोकाकुल झाले आहे. अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला. संसदेमधील त्यांच्या चर्चांचे अनेक किस्से लोकांच्या मनात अजूनही ताजे आहेत.
त्याचपैकी एक म्हणजे, पंधराव्या लोकसभेत झालेली शेरो-शायरीची दिलखुलास देवाणघेवाण. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधकांवर लक्ष्य साधत मिर्झा गालिब यांचा शेर, “हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है,” ऐकवला होता. यावर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज Sushma Swaraj यांनी बशीर बद्र यांचा शेर, “कुछ तो मजबूरियाँ रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता,” म्हणत प्रत्युत्तर दिले.
डॉ. सिंग यांनी त्यावर इकबाल यांचा शेर, “माना की तेरे दीद के काबिल नहीं हूँ मै, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो कर,” म्हणून सभागृहात एक वेगळा रंग भरला होता. सुषमा स्वराज Sushma Swaraj यांनीही एका प्रभावी शेरने उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले.
आज डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारताने एक तल्लख विचारवंत, प्रामाणिक नेते आणि जागतिक स्तरावरील नेता गमावला आहे. शरद पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, “भारताने जागतिक धुरंधर नेते गमावले.” डॉ. सिंग यांचे योगदान देशाला सदैव प्रेरणा देईल.
हे पण वाचा : नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू