महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी १५ उमेदवारांची यादी जाहीर करून बाजी मारली आहे. आजची यादी मिळून ठाकरे गटाने एकूण ८० उमेदवार जाहीर केले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या यादीमध्ये एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे. नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून माजी आमदार योगेश घोलप हे निवडणूक रिंगणात असणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत खालील उमेदवारांचा समावेश :
१) धुळे शहर- अनिल गोटे
२) चोपडा (अज) – राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
४) बुलढाणा- जयश्री शेळके
५) दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली (अजा) – योगेश घोलप
९) कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१०) कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२) शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा – मनोज जामसुतकर
१४) श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे
१५) कणकवली – संदेश भास्कर पारकर.