२७ एप्रिल रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास संगम स्वीट समोर, जयशंकर चौक, काठेगल्ली, नाशिक येथे राहणाऱ्या अमोल हिरवे याच्यावर अज्ञात इसमांनी दगडाने व कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्याबाबत जखमी अमोल हिरवे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
सपोनि सत्यवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी किश किरण शिंदे (वय १९ वर्षे, रा. ५४ क्वार्टर्स, नानावली, जुने नाशिक) व त्याचा एक विधी संघर्षित बालक साथीदार यांच्याकडून केल्याचे निष्पन्न केले. पोलीस पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले व आरोपी किश किरण शिंदे यास अटक केली.
मात्र, पोलीस कोठडीत असताना आरोपी किश शिंदे याने तपासासाठी बाहेर काढले असताना पोलिसांच्या हाताला झटका देत त्याच्या मित्राच्या मोपेड मोटारसायकलवर बसून पलायन केले. यानंतर सपोनि सत्यवान पवार व त्यांच्या पथकाने विविध भागात शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान आरोपीस पळून जाण्यास मदत करणारा किरण युवराज परदेशी (रा. कथडा, नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून पळवण्यासाठी वापरण्यात आलेली मोपेड मोटारसायकल जप्त करण्यात आली.
किरण परदेशी याने किश शिंदे यास रात्री निलगीरी बाग, आडगाव शिवारात सोडल्याचे कबूल केले, परंतु त्यानंतर तो कोठे गेला याबाबत माहिती दिली नाही. तरीही पोलीस पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास करून केवळ २४ तासांत आरोपी किश किरण शिंदे यास इगतपुरी शिवार, जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले.
सदर पथकात पोलीस हवालदार सतिष साळुंके, पोलीस हवालदार कय्युम सैय्यद, पोलीस हवालदार लक्ष्मण ठेपणे, पोलीस हवालदार अविनाश जुंद्रे, पोलीस शिपाई धनंजय हासे, पोलीस शिपाई तौसिफ सैय्यद, पोलीस शिपाई जावेद शेख, पोलीस शिपाई गुरु गांगुर्डे, पोलीस शिपाई सागर निकुंभ, पोलीस शिपाई योगेश माळी, पोलीस शिपाई उत्तम खरपडे यांचा समावेश होता.