रविवार, २ फेब्रुवारी २०२५. माघ शुक्ल चतुर्थी/पंचमी. शिशिर ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज क्षय तिथी आहे” वसंत पंचमी/श्री. पंचमी
चंद्रनक्षत्र – उत्तरा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
रवी लाभ चंद्र, चंद्र लाभ गुरू, चंद्र लाभ बुध.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. वरिष्ठ खुश राहतील. विनाकारण वादविवाद टाळा. वाहन जपून चालवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. अध्यात्मिक कार्य कराल. स्वप्ने साकार होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. बोलण्यातून प्रभाव पडणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रसन्न दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल. नवीन ओळखी होतील. प्रवास घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. स्त्री धन वाढेल. अनैतिक मार्ग कोणत्याही परिस्थितीत टाळा. यंत्र हाताळताना काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रू त्रास कमी होईल. मोठी स्पर्धा होईल. व्यावसायिक बाबतीत चांगला अनुभव येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. वेळ दवडू नका. संधी हातची घालवू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. उधार देणे टाळा. आर्थिक जोखीम नको.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती प्रसंगात संयम ठेवा. वाद विवाद टाळून माघार घ्या. सामाजिक कामातून नावलौकिक वाढेल. सुखद अनुभव येतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लहान भाऊ, नोकर यांच्याकडून लाभ होतील. उत्तम आर्थिक स्थैर्य लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण आहे. बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते आज मोकळेपणाने व्यक्त व्हा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. कठोर बोलणे होईल. गूढ उलगडतील. लेखकांना उत्तम यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)