दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शुक्रवार, 1*नोव्हेंबर 2024. अश्विन अमावास्या
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12
आज आनंदी दिवस.लक्ष्मी पूजन,महावीर निर्वाण दिन
1 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर रवी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या स्वभाव महत्त्वकांक्षी असून आणि गोष्टी तुम्ही रस घेता .तुम्ही स्वतंत्र विचारांचे वृत्तीचे असतात .सतत बदल करण्याकडे ओढ असते. कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाही .जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे वाटते. त्यामुळे बरेच चढ-उतार होतात. उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते. संभाषण चातुर्य असल्याने दुसऱ्यावर चटकन छाप पडते .कलेविषयी आकर्षण असून उत्साहाने भाग घेतात .इच्छाशक्ती दांडगी असते. व्यावहारिक जीवनावर बरोबरच गुढ विषयांचे सुद्धा आकर्षण असते .मानवी स्वभाव ओळखण्याचे ज्ञान उपजत असते .तुम्ही सभ्य, निस्वार्थी विशाल दृष्टिकोनाचे असता. तुम्ही आपले विचार दुसऱ्या वर लादता. जीवनातील रूढी,बंधने तोडण्याचे सतत प्रयत्न करतात. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो. विरोध करण्याच्या स्वभावामुळे गुप्त शत्रू तयार करतात. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. दुसऱ्यावर दया करण्यात सुप्त आनंद होतो.जीवन विषयक सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतात .पैशाच्या बाबतीत अनेक चढ-उतार होतात असं होतं .उत्तम व्यक्तिमत्त्वामुळे तरांवर छाप टाकून व्यवसायात चांगला तर्हेने पैसा मिळतो. पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. तुम्ही महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात .स्वतःचा नोकरी उद्योग करून उत्पन्नात भर घालतात .विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते .मैत्रीपूर्ण जीवनामुळे तुमचे घर म्हणजे एक सामाजिक केंद्रच असते. तुम्हाला अनेक गोष्टी त रस असतो .जीवन साथीदाराची निवड करताना आपल्यासारखाच उत्साही सौंदर्य प्रेमी ,उत्तम कपड्यांचे आवड असलेला घरात समाजात मिसळणारा असा निवडावा.
शुभ रंग:- सोनेरी पिवळा नारंगी किंवा जांभळा
शुभ दिवस:- रविवार सोमवार गुरुवार
शुभ रत्ने:- माणिक आणि पाचू.
आजचे राशिभविष्य
मेष:- आज छान दिवस आहे.मन आनंदी राहील.पतीसोबत दिवाळीचा आनंद घ्याल.
वृषभ:- आज नवीन नोकरीच्या संधी चालून येतील.आरोग्य जपा.
मिथुन:- आज संततीशी हितगुज साधा.मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल.कलाकार चमकतील.
कर्क:- आज कौटुंबिक आघाडीवर व्यग्र रहाल.दगदग होईल.खरेदी होईल.
सिंह:- आज गुपिते राखा.पराक्रम गाजवाल.आर्थिक दृष्टीने चांगला.
कन्या:- आज उत्तम,उत्साह वर्धक दिवस आहे. कामाची धावपळ वाढेल. खरेदी होईल.
तुळ:- आज छान दिवस आहे.तुमच्याच राशीत चन्द्र रवी युती आहे.मन आनंदी राहील. कामातले अडथळे दूर होतील. आर्थिक लाभ वाढेल.
वृश्चिक:- आज प्रतिकूल दिवस आहे.व्यय स्थानी चंद्र आहे. घाईगडबड नको. न पटणाऱ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करा.
धनु:- आज उत्तम दिवस आहे.लाभात चन्द्र आहे. उत्साहाने कामाला लागाल. प्रवास घडेल. मान मिळेल.
मकर:- आज उत्तम दिवस आहे. चिंता नको.नवीन कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. थोडे मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. मात्र त्यावर मात कराल.
कुंभ:- आज अनुकूल दिवस आहे.भाग्य उजळेल. नावलौकिक वाढेल.प्रसिद्धी मिळेल.दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील.आनंदी मूड राहील.खरेदी होईल.
मीन:- आज अष्टमात चन्द्र आहे.आरोग्याच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका.वाहन काळजीपूर्वक चालवा.रुटीन चालु ठेवा.घरगुती वातावरण शांत ठेवा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.