Torres Company : मुंबईत टोरेस कंपनीचा 13.48 कोटींचा घोटाळा, गुंतवणूकदारांना फसवले

13.48 crore scam of Torres Company in Mumbai, defrauded investors

गुंतवणुकीवर अविश्वसनीय परताव्याचे आकर्षण दाखवत टोरेस कंपनीने मुंबई आणि उपनगरांमध्ये एक मोठा घोटाळा उभा केला आहे. प्लॅटिनम हर्ब प्रायव्हेट लिमिटेड या परदेशी कंपनीचा ब्रँड असलेल्या टोरेसने Torres Company आठवड्याला 4% व्याजाने सुरुवात करत गुंतवणूकदारांना 11% पर्यंत परताव्याचे आमिष दाखवले.

3 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत पहिले शोरूम सुरू केलेल्या टोरेसने Torres Company पुढील काही महिन्यांत अनेक शोरूम्स उघडून ग्राहकांचा विश्वास जिंकला. कंपनीने सोने, हिरे, आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केली.

सुरुवातीला 4% नफा देणाऱ्या कंपनीने हळूहळू व्याजदर 6% आणि नंतर 11% पर्यंत वाढवला. गुंतवणुकीवर बोनस देण्याचं आश्वासनही दिलं. गुंतवणूकदारांनी घर, सोनं, पीएफ आणि कर्ज यांचा आधार घेत कोट्यवधी रुपये गुंतवले.

डिसेंबर 2024 पासून परतावा थांबवून 30 डिसेंबरनंतर कंपनीने सर्व कार्यालये आणि शोरूम बंद केली. 6 जानेवारीला सर्व संचालक आणि सीईओ फरार झाल्याचं समोर आलं. या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांचे 13.48 कोटी रुपये बुडाले आहेत.

एडवोकेट तरुण शर्मा यांनी काही आठवड्यांपूर्वीच पोलिसांत तक्रार केली होती, पण वेळेत कारवाई झाली नाही. परिणामी, सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

अशा चिटफंड घोटाळ्यांमुळे पुन्हा एकदा सावध गुंतवणुकीची गरज अधोरेखित झाली आहे. जास्त परताव्याच्या आमिषाला बळी न पडता सुरक्षित गुंतवणूक करणे हीच शहाणपणाची गोष्ट ठरणार आहे.