सोलापूर :
कार्तिक शुद्ध एकादशी १२ नोव्हेंबर रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. – यंदा कार्तिक आषाढी यात्रेतील शासकीय महापूजेचा मान पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मिळाला आहे. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री – यांना असतो. मात्र यंदा आचारसंहिता असल्याने – उपमुख्यमंत्र्यांऐवजी महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना -मिळाला असल्याचे मंदिर समितीने सांगितले. आषाढी – यात्रेच्या अनुषंगाने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहेत. पालख्यांचे आगमन होत आहे, ६५ एकर – परिसरात वारकरी मोठया संख्येने दिसून येत आहेत. पंढरपूर शहरात गर्दी वाढत असून विठ्ठलाची दर्शनरांग
पत्राशेडपर्यंत गेली आहे. कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ६२६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.