नाना पाटेकर यांच्या ‘वनवास’ Vanvas या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी छाप पाडलेली नाही. चित्रपटाने चार दिवसांत केवळ ३.४० कोटी रुपये कमावले असून, ‘पुष्पा 2’ आणि ‘मुफासा’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या जोरदार स्पर्धेत तो कमी पडला आहे.
Vanvas पहिल्या चार दिवसांची कमाई
पहिला दिवस (शुक्रवार) : ६० लाख रुपये
दुसरा दिवस (शनिवार) : ९५ लाख रुपये
तिसरा दिवस (रविवार) : १.४ कोटी रुपये
चौथा दिवस (सोमवार) : ४५ लाख रुपये
‘वनवास’ Vanvas चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्याभोवती फिरतो. कुटुंबासह पाहण्यासारखा असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपट प्रेक्षक खेचण्यात अपयशी ठरला आहे.
‘वनवास’च्या निर्मितीसाठी ३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चित्रपटात नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, आणि सिमरत कौर यांच्यासह खुशबू सुंदर, राजपाल यादव, अश्विनी काळसेकर, मनीष वाधवा यांसारखे कलाकार आहेत.
चित्रपटाला ‘पुष्पा 2’ आणि ‘मुफासा’ या बिग बजेट चित्रपटांमुळे जोरदार स्पर्धा सहन करावी लागत आहे. या दोन चित्रपटांच्या क्रेझसमोर ‘वनवास’ अपुरा पडत असल्याचे दिसत आहे.