Walmik karad : संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात शरण; आरोप फेटाळले

Walmik karad atak

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड Walmik Karad आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा व्हिडीओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे.

व्हिडीओत ते म्हणाले, “माझ्याविरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी, पण राजकीय द्वेषातून माझे नाव उगाच या प्रकरणात ओढले जात आहे. पोलिस तपासात जर मी दोषी आढळलो, तर न्याय देवतेकडून जी शिक्षा मिळेल ती भोगण्यास तयार आहे.”

loksatta youtube video

वाल्मिक कराड (Walmik Karad) कोण आहेत?
वाल्मिक कराड हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत म्हटले होते, “वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही.”

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप केले. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.