शनिवार, 7 सप्टेंबर 2024. भाद्रपद शुक्ल चतुर्थी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – सकाळी 9 ते 10:30
आज आनंदी दिवस आहे” गणेश चतुर्थी पार्थिव गणेश पूजन. चंद्रदर्शन निषेध
गणेश पूजन मुहूर्त
पहाटे 4:50 ते दुपारी 1:51 पर्यंत
7 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीन बद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी किंवा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासान तास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आजचा दिवस आनंदी आहे. प्रसिद्धी मिळेल.कौतुक होईल. नात्यातून लाभ होतील.
वृषभ:- मैत्रिणींनो आज षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामात काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ होईल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज उत्तम दिवस आहे. विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल. लॉटरी मधून लाभ मिळतील.
कर्क:-मैत्रिणींनो कामात वाढ होईल. नवीन संधी चालून येतील. बागकामाचा छंद ज
जोपासाल.
सिंह:- मैत्रिणींनो आज तृतीय स्थानी चंद्र आहे. भरपुर कमाई होईल. अधिकार वाढतील. तुमचे वर्चस्व वाढेल.
कन्या:- मैत्रिणींनो आज अत्यंत सुखद अनुभव येतील. कामातल्या अडचणी दूर होतील. पैशांची व्यवस्था होईल.
तुळ:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. कामाचा ताण कमी होईल.सुख लाभेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. वाहन जपून चालवा. गैरसमज टाळा।
धनु:-मैत्रिणींनो आज सुंदर दिवस आहे. कौटुंबिक कामाला प्राधान्य द्याल. शत्रू पराभूत होतील.
मकर:- मैत्रिणींनो आज व्यावसायिक वाढ होईल. मेहनत जास्त आणि कमाई ही भरपूर राहील. आरोग्य सांभाळा.
कुंभ:- मैत्रिणींनो आज धनसंपत्ती वाढेल. नवीन संधी चालून येतील. धार्मिक कार्यात मग्न रहाल. .
मीन:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मान सन्मान मिळतील.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.