काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी कुस्तीपटू विनेश फोगाटची उमेदवारी जुलाना विधानसभा मतदारसंघातून घोषित करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आणि तासाभरात विनेशला निवडणुकीचं तिकीट देण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

तथापि, बजरंग पुनियाची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही, पण दुसऱ्या यादीत त्याचे नाव असण्याची शक्यता आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघात जननायक जनता पार्टीचे विद्यमान आमदार अमरजीत ढांडा आहेत, ज्यांना जेजेपीने यंदाही उमेदवारी दिली आहे. भाजपने या मतदारसंघातून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३० जणांना उमेदवारी दिली आहे. यादीतील इतर उमेदवारांची माहिती तपासण्यासाठी अधिकृत घोषणांची अपेक्षा आहे.

Leave a Reply